Central teams in six states to control corona infection.
कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहा राज्यांमध्ये केंद्रीय पथकं.
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह, कर्नाटक, तमीळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणता यावी यासाठी, या राज्यांमध्ये केंद्रीय पथकं पाठवली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
ते आज बातमीदारांशी बोलत होते. या राज्यांमध्ये पाठवलेली पथकं, तिथली परिस्थिती पाहून राज्यांना आवश्यक मार्गदर्शन करतील असं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण उत्तरोत्तर वाढतं राहीलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. देशात मोठ्या प्रमाणावर कोविड प्रतिबंधक लसीकरण झाल्याचा फायदा कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या लाटेत झाला आहे, लसीकरणामुळे आजाराची तीव्रता आणि मृत्यूचं प्रमाण कमी राहिलं असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं.