The state drama competition was postponed due to Covid’s growing contagion.
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली.
मुंबई : ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून व स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेलद्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या १५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.
विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाच्या त्यावेळी असणाऱ्या नियमांस अनुसरून नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.