कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्वागत.

Health Minister Rajesh Tope हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्वागत.

Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope. File Photo

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे.

बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती. त्याचबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती.

पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल आणि कोविड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *