COVID-19 UPDATE
कोविड–19 घडामोडींवरील माहिती.
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 39 लाखांहून अधिक (39,46,348) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 157 कोटी 20 लाखांचा (1,57,20,41,825) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,68,75,217 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
गेल्या 24 तासांत 1,51,740 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,52,37,461 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 94.27% झाला आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 2,58,089 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 16,56,341 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 4.43% आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 13,13,444 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 70 कोटी 37 लाखांहून अधिक (70,37,62,282) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 14.41% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 19.65% इतका आहे.
इतर अपडेट्स :
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 13 कोटी 79 लाखांपेक्षा अधिक न वापरलेल्या मात्रा शिल्लक आहेत.