कोविनचे नवीन फिचर KYC-VS

CoWIN launches new API

कोविनचे नवीन फिचर KYC-VS.

नो युवर कस्टमर्स /क्लायंट्स व्हॅक्सिनेशन स्टेटस.

KYC-VS मुळे एखाद्या व्यक्तीचे लसीकरण झाले आहे किंवा नाही हे कोविनच्या माध्यमातून समजेल. CoWIN launches new API

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी पासून कोविडविरोधी लसीकरण मोहीम सुरू केल्यापासून आत्तापर्यंत 72 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा वितरित करण्यात आल्या आहेत. लसीकरण केलेल्या व्यक्तीला लसीकरणाबाबत खात्री देणारे प्रमाणपत्र कोविनच्या माध्यमातून देण्यात येते.

हे प्रमाणपत्र स्मार्टफोन ,टॅबलेट, लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर डिजिटली कायमस्वरूपी ठेवता शकते त्याच प्रमाणे हे प्रमाणपत्र डीजी-लॉकर मध्ये साठवून लसीकरणाचा पुरावा म्हणून केव्हाही सादर करता येऊ शकते.

त्याचप्रमाणे मॉल्स, कार्यालय संकुल, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र द्यावे लागते व ते डिजिटल त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपातही उपलब्ध होऊ शकते.

परंतु काही प्रसंगी हे प्रमाणपत्र पूर्ण पाहण्याची गरज नसते तर समोरील व्यक्तीने लस घेतली आहे किंवा नाही एवढीच खरी माहिती जाणून घेणे आवश्यक असते. अशा काही शक्यता पुढील प्रमाणे.

१) एखाद्या व्यक्तीला कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी कामे करण्यास पाठवण्यापूर्वी एखादी संस्था किंवा रोजगार देणाऱ्याला त्या व्यक्तीच्या लसीकरणाबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक वाटते.

२ रेल्वे गाडीतील जागेसाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही हे माहीत करून घेणे रेल्वेला आवश्यक असते.

अशावेळी याबद्दल खातरजमा करून घेऊन त्या व्यक्तीच्या लसीकरणाबाबत पुढील प्रकारे खात्रीशीर माहिती देणारा प्रतिसाद कोविन पाठवू शकेल.

0 – व्यक्तीचे लसीकरण झालेले नाही

1 – व्यक्तीचे अंशतः लसीकरण झालेले आहे

2 – व्यक्तीचे लसीकरण संपूर्णपणे झाले आहे

हा प्रतिसाद डिजिटली स्वाक्षरांकित असेल आणि तपासणी करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला तो ताबडतोब सादर करता येईल.

रेल्वेत तिकीट आरक्षण करतेवेळी या सुविधेचा वापर एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणून देता येईल. आरक्षित तिकीट घेण्यासाठी व्यक्तीने त्यावरून संबंधित संस्था त्याच वेळी व्यक्ती परवानगीने त्या व्यक्तीच्या लसीकरणा बद्दल माहिती मिळवू शकेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *