गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरकांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांचे छापे.

Income Tax Department Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरकांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांचे छापे.

गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरक कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी छापे घातले आणि काही मुद्देमाल जप्त केला. अहमदाबाद इथल्या 15 पेक्षा जास्त स्थळी ही कारवाई करण्यात आली.Income Tax Department

यावेळी झालेल्या शोधमोहिमेत, विविध संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे आढळले आणि ते जप्त करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे, अनेक गैरव्यवहार करुन करपात्र उत्पन्नावरील कर बुडवल्याचे स्पष्ट आढळले आहे. यात, मालाच्या खरेदीचे हिशेब नसणे, मालाच्या किमतीपेक्षा कमी किमतीच्या पावत्या, रोख रकमेच्या खर्चाचा हिशेब नसणे, असे प्रकार आढळले.या कारवाईत जप्त केलेल्या मालाची पुढची तपासणी केल्यानंतर, या मालाच्या रोख खरेदीचा तपशील खातेवहीत नोंदवला नसल्याचेही आढळले. तपास पथकाने, स्थावर मालमत्तेत उघड न केलेली गुंतवणूक या कंपनीने केल्याचे पुरावेही शोधून काढले आहेत.

या शोधमोहिमेदरम्यान, तपास पथकाने 7.50 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली आहे तसेच 4 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या कंपनीचे बँक लॉकर्स बंद करण्यात आले आहेत.

या कारवाईत आतापर्यंत 100 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तेची कबुली या कंपनीने दिली आहे.

पुढील तपास सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *