गुटखा विक्रेत्याकडून १० लाखाचा साठा जप्त.
परिमंडळ ५ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सं.भा.नारागुडे यांना प्राप्त माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर, रा.भि. कुलकर्णी यांच्या पथकाने आज पहाटे ५ वाजता गुटखा विक्रेता राजु मलबारे यांच्या घरासमोरील वाहनामधून १० लाख ४४ हजार ४०० रुपयांचा पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुगंधीत सुपारी साठा जप्त केला.
कारवाईत ७ लाख रुपये किंमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले असून यवत पोलिस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधिताविरोधात यवत पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३२८ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नागरिकांनी गुटखा, पानमसाला विक्रीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन श्री.नारागुडे यांनी केले आहे.