गुळ व साखरेचा ९६२८ किलो साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.
पुणे : हवेली तालुक्यात कोलवडी येथील, मे.बोरमलनाथ गुळ उद्योगातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत भेसळीच्या संशयावरून; ९८ हजार २४० रुपये किंमतीचा ३०७० किलो गुळ आणि २ लाख २९ हजार ५३० रुपये किंमतीची ६५५८ किलो साखर असा ९६२८ किलो साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागाचे सहआयुक्त, शि.स.देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ.ध. झांजुर्णे यांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुऱ्हाळावर धाड टाकली.
यापुढेदेखील अन्न व औषध प्रशासनातर्फे अशा स्वरुपाची कारवाई सुरू ठेवली जाणार असून नागरिकांनी अन्न भेसळीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन परिमंडळ ३ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा.ए. देसाई यांनी केले आहे.