गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे अमित देशमुख यांचे निर्देश

Amit Deshmukh  instructed to prepare a plan for providing all facilities in Goregaon Film City.

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे अमित देशमुख यांचे निर्देश.Amit Deshmukh  instructed to prepare a plan for providing all facilities in Goregaon Film City.

मुंबई: मुंबईत गोरेगाव इथल्या फिल्मसिटीमध्ये चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते आज फिल्मसिटीमधे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

फिल्मसिटीमध्ये मराठीबरोबरच विविध भाषांमधले चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरीज, माहितीपट यांचं चित्रीकरण सुरु असतं. त्यादृष्टीनं फिल्मसिटीत अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टुडिओ निर्माण करणं आवश्यक आहे. फिल्मसिटीमध्ये हे सर्व एकाच ठिकाणी कसे करता येऊ शकेल याबाबत दोन कंपन्यांनी यावेळी सादरीकरण केलं. त्यातल्या बाबींचा विचार करुन फिल्मसिटीमध्ये सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करावा, असं त्यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *