Applications for Goa and Uttarakhand Assembly elections as well as for the second phase of Assembly elections in Uttar Pradesh will start today.
गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी तसंच उत्तर प्रदेशातल्या विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश मधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आणि गोवा तसंच उत्तराखंड इथल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आजपासून झाली. उत्तर प्रदेशमध्ये 14 फेब्रुवारीला 55 जागांसाठी मतदान होणार आहे.
यात अनुसूचित जातींसाठी आरक्षित नऊ जागांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी नामांकनपत्र दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस आहे.
पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी 388 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. काल दोनशे पाच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. बसपा आणि समाजवादी पार्टीनं त्यांचे दोन उमेदवार ऐनवेळी बदलले. बसपानं उत्तर मधून मुरारी लाल यादव ऐवजी शब्बीर अब्बास यांना उमेदवारी दिली आहे.
गोवा आणि उत्तराखंड मध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून २८ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. या महिन्याच्या 29 तारखेला अर्जांची छाननी होईल आणि 31 जानेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
गोव्यात एकूण 40 जागांपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. उत्तराखंड मध्ये एकूण 70 जागा आहेत यापैकी 13 जागा अनुसूचित जातीच्या आणि २ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.