The Prime Minister will flag off the first Vande Bharat Express in Goa on June 3
गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडा
देशातील ही 19वी वंदे भारत रेल्वेगाडी असेल
मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास वंदे भारत रेल्वे सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल; यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासाची बचत
या रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव आणि पर्यटनाला चालना मिळणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील.
पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील 19वी वंदे भारत रेल्वे असेल.
ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वेगाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासाची बचत होईल.
स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com