ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्थांमार्फत देशभरात 87 मोबिलायझेशन शिबिरे.

Azadi ka Amrit Mahotsav.

‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा भाग म्हणून  ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्थांमार्फत देशभरात 87 मोबिलायझेशन शिबिरे आयोजित करण्यात आली.

‘आझादी का अमृत महोत्सव’  कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरात ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्थांमार्फत देशभरात, 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2021 या काळात 87 मोबिलायझेशन शिबिरे आयोजित केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून   ‘आझादी का अमृत महोत्सव’ मध्ये  कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात येत आहे. देशभरात जन भागीदारीचे चैतन्य निर्माण करत जन उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’
‘आझादी का अमृत महोत्सव’

19 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशातल्या 87 जिल्ह्यात 87 शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्थांमार्फत 64 अभ्यासक्रमात एकूण 37.81 लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आणि 26.65 लाख उमेदवार स्वयं रोजगार प्राप्त झाले आहेत.  28 राज्ये आणि 7 केंद्र शासित प्रदेशात सध्या हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, 23 आघाडीच्या बँक पुरस्कृत हा कार्यक्रम 585 ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्थांमार्फत राबवण्यात येत आहे.

ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्था कार्यक्रम हा केंद्रीय ग्रामीण विकास, राज्य सरकार आणि प्रयोजन बँका अशा तिघांच्या भागीदारीने राबवण्यात येत असलेला कार्यक्रम आहे. अल्पावधीचे प्रशिक्षण आणि उद्योजकांना दीर्घकाळ मदतीचा हात हे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 18-45 वयोगटातले ग्रामीण भागातले गरीब युवा या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. ग्रामीण भागातल्या गरीब युवकांच्या आकांक्षांना उद्योजकता कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक म्हणून यशस्वी करण्यासाठी बळ देण्याकरिता ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्था अग्रणी आहे. मोबिलायझेशन शिबिरे, या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असून संभाव्य उमेदवारांपर्यंत पोहोचून आणि त्यांना योजना आणि त्यातल्या तरतुदी बाबत माहिती देऊन व्यापक संधी याद्वारे दिली जाते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *