Homeowners can install rooftop solar power plants from any vendor of their choice.
घरमालक त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून छतावर सौरऊर्जा संयंत्र स्थापित करू शकतात.
घरमालक त्याच्या आवडीने सौर पॅनेल आणि इन्व्हर्टर निवडू शकतात.
नवी दिल्ली : केंद्रीय ऊर्जा मंत्री तसेच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री श्री.आर.के.सिंग यांनी 19 जानेवारी 2022 रोजी छतावरील सौर ऊर्जा संयंत्र योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.हा आढावा घेतल्यानंतर, केंद्रीय मंत्र्यांनी रूफ टॉप योजना सुलभ करण्यासाठी निर्देश दिले, जेणेकरून लोकांना ती सहजपणे उपलब्ध होईल.
यापुढे कोणत्याही घराला सूचीबद्ध विक्रेत्यांकडूनच छप्परावर सौरऊर्जा संयंत्र बसवण्याची गरज भासणार नाही,असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. घरमालक स्वतःहून आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जा संयंत्र स्थापित करू शकतात किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून रूफ टॉप स्थापित करू शकतात आणि स्थापित केलेल्या यंत्रणेची छायाचित्रासह वितरण कंपनीला माहिती देऊ शकतात.
छतावरील सौरऊर्जा संयंत्राच्या स्थापनेची डिसकाॅमला (DISCOM) माहिती पत्र/अर्जाद्वारे कळवू शकतील,किंवा डिसकाॅमने (DISCOM) आणि सरकारने स्थापन केलेल्या नियुक्त वेबसाइटवर ही माहिती सामग्री स्वरूपात दिली जाऊ शकते. रूफ टॉप योजनेसाठी माहिती मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत नेटमीटरिंग प्रदान केले जाईल याची वितरण कंपनी खात्री करेल.
भारतात शासनाकडून देण्यात येणारे अनुदान, 3 किलोवॅट क्षमतेच्या छतासाठी 40% आणि 10 किलोवॅटपर्यंतच्या 20% पेक्षा जास्त आहे,जे डिसकाॅमद्वारे(DISCOM) इंस्टॉलेशनच्या 30 दिवसांच्या आत घरमालकाच्या खात्यात जमा केले जाईल.
सौर पॅनेल आणि इन्व्हर्टरची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार आहे याची खात्री करण्यासाठी; सरकार भारतातील असे सोलर पॅनेल उत्पादक आणि इन्व्हर्टर उत्पादक जे आपल्या उत्पादनांची अपेक्षित गुणवत्ता मानके पूर्ण करतात, अशा उत्पादकांच्या याद्या सरकार वेळोवेळी प्रकाशित करेल आणि घरमालक त्याच्या आवडीचे सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टर त्यांच्यावर किंमतीप्रमाणे त्या यादीत निवडू शकतो.
डिसकाॅमने (DISCOM द्वारे )नियुक्त केलेल्या कोणत्याही विक्रेत्यांद्वारे रूफ टॉप बसवण्याचा पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध आहे. तरीही घरमालकांना त्यांच्या आवडीचे सोलर पॅनल आणि इन्व्हर्टर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.