World Bank says the Indian economy to grow at 8.3 per cent during the current financial year and 8.7 per cent in the next fiscal.
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज.
दिल्ली: चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ३ दशांश टक्के अपेक्षित असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
पुढच्या आर्थिक वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा दर ८ पूर्णांक ७ दशांश राहील असं जागतिक बँकेच्या ताज्या जागतिक आर्थिक अहवालात म्हंटल आहे.
पायाभूत सुविधांमध्ये खाजगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे त्याचबरोबर आर्थिक सुधारणांचे लाभही दिसू लागले आहेत.
त्यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ४ पूर्णांक १ दशांश टक्क्यापर्यंत घसरेल तर पुढच्या आर्थिक वर्षात हा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.