छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.Vidhan Parishad

मुबंई : छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे अराध्य दैवत आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही सर्वांचीच भूमिका आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य विनायकराव मेटे यांनी अरबी समुद्रात मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय गेली अनेक वर्षापासून रखडलेला आहे. या शिवस्मारक बांधकामाबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत लक्षवेधी मांडली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचीच सकारात्मक भूमिका आहे.

कोरोना परिस्थ‍ितीमुळे; या कामाच्या मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या स्मारकाचे काम करणाऱ्या मे. एल अँड टी लिमिटेड कंपनीला आजतागायत कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करण्यात आली नाही तसेच या कंपनीसोबत मुदतवाढ न देता करार रद्द करावयाचे ठरवले असते तर त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी लागली असती.

या कामाबाबतचा करारनामा करण्यापूर्वी तसेच करारनामा केल्यानंतर उद्भवलेले न्यायालयीन दावे यावर देखील काम सुरू आहे. तसेच या कामाला मुदतवाढ देताना त्यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम संस्थेला देण्यात येणार नाही.

या कामाबाबत सातत्याने वेळोवेळी आढावा घेऊन हे काम सुरू व्हावे तसेच हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *