जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.
पुणे : जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 2 डिसेंबर 2021 रोजी सातव्या पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यासाठी नामांकित उद्योजकांनी ऑनलाईन रिक्तपदे अधिसूचित केली आहेत.
दहावी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदविका अभ्यासक्रमासाठी मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, ग्राइंडर, मशिनिस्ट, पेंटर जनरल, शीटमेंटल वर्कर, सिक्युरिटी गार्ड, सीएनसी ऑपरेटर हाऊसकीपिंग आदी प्रकारची पदे उपलब्ध आहेत. रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन होऊन नोंदणी करावी.
नोंदणी करण्याबाबत अथवा मेळाव्यात सहभागी होण्याबाबत समस्या असल्यास कार्यालयाच्या 020-26133606 या क्रमांकावर संपर्क साधावा. रोजगारा मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन पसंतीनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
—