District Skill Development Center organizes an online job fair.
जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.
पुणे : जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवार २ फेब्रुवारी २०२२ रोजी आठव्या पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यासाठी नामांकित उद्योजकांनी ऑनलाईन रिक्तपदे अधिसूचित केली आहेत.
दहावी, बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदविका अभ्यासक्रमासाठी आय.टी.आय. वीजतंत्री, यांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन मॅकनिकल इंजिनियरिंग), अभियांत्रिकी पदवी (बी.ई.), संगणक चालक, विक्री प्रतिनिधी (सेल्स एक्सिक्युटीव्ह), विक्री सल्लागार (सेल्स कन्सल्टंट), अभियांत्रिकी पदविका (इंजिनियरिंग डिप्लोमा) आदी प्रकारची पदे उपलब्ध आहेत. रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन होऊन नोंदणी करावी.
नोंदणी करण्याबाबत अथवा मेळाव्यात सहभागी होण्याबाबत समस्या असल्यास कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा. रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती अद्ययावत करण्यात येत असल्याने उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन पसंतीनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.