जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

State Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Zilla Parishad and Panchayat Samiti announce program leaving reservation

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला),State Election Commission. राज्य निवडणूक आयोग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम १३ जुलै रोजी होणार आहे.

सोडत कार्यक्रमानंतर १५ जुलै रोजी निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. या आरक्षणाबाबत १५ जुलै ते २१ जुलै २०२२ पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. २ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धीनंतर १५ ते २१ जुलै या कालावधीत पुणे जिल्हा परिषद निवडणुक विभागाच्या व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षणावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, बी विंग, तिसरा मजला, पुणे-४११००१ तसेच संबंधित तहसिल कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व गणाचे आरक्षण सोडत कार्यक्रम १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नमूद ठिकाणी होणार आहे.

पुणे जिल्हा परिषद- मा. श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह, पहिला मजला, पुणे जिल्हा परिषद, पुणे (नविन इमारत) कॅम्प, पुणे

जुन्नर पंचायत समिती- जिजामाता सभागृह (पंचायत समिती आवार) जुन्नर

आंबेगांव पंचायत समिती- तहसिल कार्यालय आंबेगाव, पहिला मजला, मिटींग हॉल, आंबेगांव

शिरुर पंचायत समिती -तहसिल कार्यालय शिरुर, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सभागृह क्र. १ शिरूर

खेड पंचायत समिती -चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय, बाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड

मावळ पंचायत समिती -भेगडे लॉन, जुना पुणे-मुंबई रस्ता, वडगाव, ता. मावळ

मुळशी पंचायत समिती-सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती मुळशी (पौड), ता. मुळशी

हवेली पंचायत समिती – जुनी जिल्हा परिषद, महात्मा गांधी सभागृह, पंचायत समिती हवेली

दौंड पंचायत समिती -नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय दौंड, दुसरा मजला सभागृह, दौंड

पुरंदर पंचायत समिती -पंचायत समिती पुरंदर येथील श्री. छत्रपती संभाजी महाराज सभागृह, सासवड, ता. पुरंदर

वेल्हे पंचायत समिती-पंचायत समिती कार्यालय येथील नविन सभागृह , ता. वेल्हे

भोर पंचायत समिती-अभिजित भवन मंगल कार्यालय महाड नाका, संजय नगर, ता. भोर

बारामती पंचायत समिती- कविवर्य मोरोपंत नाटय मंदीर, इंदापूर रिंग रोड, नवीन प्रशासकीय भवन समोर, बारामती

इंदापूर पंचायत समिती-लोकनेते शंकरराव पाटील सभागृह, पंचायत समिती इंदापुर

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *