जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याभरात १ लाख ३४ हजार दाखल्याचे वितरण

Get certificates, certificates, benefits of various schemes through Mahashibir at less efforts  दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Distribution of 1 lakh 34 thousand certificates within a month on behalf of the district administration

जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याभरात १ लाख ३४ हजार दाखल्याचे वितरण

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणतेही दाखले अडविले नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

पुणे : जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे दाखले वितरण करणे रोखले नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे. गेल्या सुमारे महिनाभराच्या कालावधीत विविध प्रकारचे सुमारे १ लाख ३४ हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.Get certificates, certificates, benefits of various schemes through Mahashibir at less efforts  दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १ जून ते ९ जुलै २०२३ या कालावधीत शपथपत्रासह नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र नुतनीकरण ३, उत्पन्नाचा दाखला ७७ हजार ८२१, रहिवासी दाखला २ हजार ६७३, वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास दाखला २४ हजार ६३५, पतदारी प्रमाणपत्र २३, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३५५, अल्पभूधारक दाखला ४३४, नॉन क्रिमिलियर नूतनीकरण प्रमाणपत्र १७, जातीचा दाखला ६ हजार ९७५, शपथपत्रासह
जातीचा दाखला ९२१, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ८ हजार १६८, शपथपत्रासह नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र १ हजार ८५, शेतकरी प्रमाणपत्र ५८४, भूमिहीन प्रमाणपत्र ६४, ३३ टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र ४३०, आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र ९ हजार २९४, केंद्र सरकारसाठी आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र ५००, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला २६३ असे एकूण १ लाख ३४ हजार २४५ दाखल्याचे नागरीक व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण आले आहे. दाखले वाटपाची प्रकिया ही निरंतर चालणारी प्रकिया आहे. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची दाखले अडविले नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथून या आठवड्यात प्रक्षेपित होणार
Spread the love

One Comment on “जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याभरात १ लाख ३४ हजार दाखल्याचे वितरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *