Permission to start 49 Aadhaar Centers in the district
जिल्ह्यातील ४९ आधार केंद्र सुरू करण्यास परवानगी
प्रमाणपत्र तात्पुरते गोठविण्यात आलेल्या ९६ आधार केंद्र चालकांपैकी ४९ आधार केंद्रचालकांना पूर्ववत केंद्र सुरु करण्यास परवानगी
पुणे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन न केल्याने प्रमाणपत्र तात्पुरते गोठविण्यात आलेल्या ९६ आधार केंद्र चालकांपैकी ४९ आधार केंद्रचालकांना पूर्ववत केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून ही सर्व केंद्र सद्यस्थितीत कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील ९६ आधार केंद्रचालकांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात ८२ केंद्रचालक उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ४९ केंद्र चालकांनी केंद्र सुरू केले आहे, १० ऑपरेटरांना एका वर्षाकरीता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून बंधन घालण्यात आलेले आहे.
उर्वरीत एकूण ३७ पैकी १८ ऑपरेटर हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून एएमएस पोर्टलवरती अगोदरच नोंदवलेले असल्यामुळे, पूर्ववत करण्यात तांत्रिक मान्यता घेण्यात येत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या काही दिवसात हे ऑपरेटर व उर्वरीत सर्व आधार ऑपरेटर कार्यरत होणार असल्याबाबत सांगण्यात आले आहे, असे आधार समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर धुमाळ यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “जिल्ह्यातील ४९ आधार केंद्र सुरू करण्यास परवानगी”