टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा थेट अभिकर्ता होण्याची संधी !

Postal Life Insurance

टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा थेट अभिकर्ता नियुक्ती.

टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा थेट अभिकर्ता नियुक्तीच्या थेट मुलाखती करिता उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रोड, पुणे या पत्त्यावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तावेज समवेत उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.  Postal Life Insurance

पात्रता आणि अन्य मापदंड:- वयोमर्यादा- उमेदवाराची वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ५० वर्षे, शैक्षणिक अहर्ता- मान्यताप्राप्त केंद्रीय, राज्य सरकारच्याबोर्ड, संस्थांमधून दहावी/ बारावी उत्तीर्ण, अनुभव- आवेदनकर्त्यास विमा क्षेत्राबाबतची माहिती व विपणन कुशलता असणे आवश्यक, पात्रता :- बेरोजगार , स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार , कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा अभिकर्ता साठी पात्र आहेत.

थेट अभिकर्ता म्हणून नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता नियमितपणे देण्यात येईल, थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमाचे निवड झालेल्या उमेदवार नियुक्त केले जातील, नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल, नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी स्वखर्चाने विभागीय कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे लागेल. परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना परवाना देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरीता रुपये २५० आणि परवाना परीक्षेसाठी रुपये २८५ फी म्हणून सादर करावी लागेल. (ACG- ६७ स्वरुपात) नियुक्त झालेल्या थेट अभीकर्त्यास रु. ५००० टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र मध्ये भारताचे राष्ट्रपती यांच्या नावे तारण म्हणून ठेवणे बंधनकारक आहे.
थेट मुलाखती करीता उमेदवारांनी निम्नलिखित पत्यावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तावेज समवेत उपस्थित राहावे. मुलाखत दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत. मुलाखत स्थळ : अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रोड, पुणे ४११००५. संपर्क : श्री व्ही. एस. देशपांडे, DOPLI, मोबाईल क्र.९४२०९६५१२२ संपर्क साधावा, असेही पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *