Permission to Dr DY Patil College of Ayurveda and Research Center to increase the admission capacity of postgraduate courses.
डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी.
मुंबई : पुण्याच्या डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरला कायाचिकित्सा(Physiotherapy), प्रसूतीतंत्र(Obstetrics), स्त्रीरोग(Gynecology) आणि कौमारभृत्य बालरोग(Adolescent Pediatrics.) या विषयातील आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची(Post Graducate Medical Admission) प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कायाचिकित्सा (Physiotherapy) या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता 6 वरुन 12, प्रसूतीतंत्र(Obstetrics) आणि स्त्रीरोग (Gynecology) या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (Post Graduage Medical Admission) विद्यार्थी प्रवेशक्षमता 6 वरुन 12 आणि कौमारभृत्य बालरोग(Adolescent Pediatrics) या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (Post Graducate Medical Admission) विद्यार्थी प्रवेशक्षमता 4 वरुन 12 करण्यात आली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून ही परवानगी देण्यात आली आहे.
या आयुर्वेद महाविद्यालयातील कायाचिकित्सा(Physiotherapy), प्रसूतीतंत्र(Obstetrics), स्त्रीरोग(Gynecology) आणि कौमारभृत्य बालरोग(Adolescent Pediatrics.) या विषयातील आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारित केल्यानुसार राहील.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता (Medical Admission) निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे.
राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.