डॉ. मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आरोग्य योजनेचे सुधारित संकेतस्थळ आणि “MyCGHS” या मोबाईल ऍपचा केला प्रारंभ.

Dr Mansukh Mandvia launches the revised website of the Central Health Scheme and mobile app “MyCGHS”.

डॉ. मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आरोग्य योजनेचे सुधारित संकेतस्थळ आणि “MyCGHS” या मोबाईल ऍपचा केला प्रारंभ.

वापरण्यास अनुकूल संकेतस्थळ 40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध करून देईल”.

भारताच्या वाढत्या डिजिटल प्रसारामुळे हे एक महत्त्वाचे आणि कालानुरूप पाऊल शक्य झाले : डॉ. मनसुख मांडविया.

नवी दिल्‍ली :  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया, यांनी आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्यDr Mansukh Mandvia launches the revised website of the Central Health Scheme and mobile app "MyCGHS". योजनेचेसुधारित संकेतस्थळ (www.cghs.gov.in) आणि “MyCGHS” या मोबाईल ऍपचा  डिजिटल प्रारंभ केला.

“मोबाईल अॅपशी जोडलेल्या केंद्रीय आरोग्य योजनेच्या  सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ  हे  भारताच्या वाढत्या डिजिटल प्रसारामुळे हे  एक महत्त्वाचे आणि काळानुरुप  पाऊल शक्य झाले . या संकेतस्थळामध्ये अनेक अद्ययावत वैशिष्ट्ये आहेत ज्यातील वास्तविक माहितीचा  40 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना (सेवेतील आणि सेवानिवृत्त कर्मचारी दोन्ही) घरी बसूनच   मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की अशा सुविधेमुळे आरोग्य सेवा ही घराबाहेर न पडता वितरीत करणे शक्य होईल आणि सध्या सुरू असलेल्या कोविड19  महामारीच्या  काळात हे एक नाविन्यपूर्ण पाऊल आहे. भारताच्या वाढत्या डिजिटल   प्रसारामुळे  हे एक महत्त्वाचे आणि काळाला अनुसरून उचललेले  पाऊल आहे, असेही ते  म्हणाले.

या सुधारित सुविधांसह, लाभार्थ्यांपर्यंत विविध सुविधा सुलभरीत्या उपलब्ध करून देणे हे या केंद्रीय आरोग्य योजनेचे उद्दिष्ट आहे.

नवीन सीजीएचएस संकेतस्थळ  आणि त्याचा  “MyCGHS” नावाचा मोबाईल ऍप्लिकेशन विस्तार, लाभार्थी  अनुकूल वैशिष्ट्यांसह, लाभार्थ्यांना विशेषतः कोविड महामारीच्या काळात त्यांच्या घराच्या सुरक्षित जागेत  सुलभपणे सेवा वितरण करण्याच्या दृष्टीने तयार केले  आहे.

याबद्दल आनंद व्यक्त करताना, राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की, “महामारीच्या  काळात डिजिटल मीडिया स्रोतांच्या वापराविषयी माहिती मिळाल्यामुळे  हे  शक्य झाले  आहे. डिजिटल आरोग्य अभियानाच्या धर्तीवर , लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार लाभ मिळावा यासाठी हे  नवीन संकेतस्थळ  सुरू करण्यात आले  आहे.”

केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) ही केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक  आणि या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थी आणि त्यांच्या आश्रितांच्या काही इतर  श्रेणींसाठी नोडल आरोग्य सेवा प्रदाता आहे. भारताच्या वाढत्या डिजिटल प्रसाराची पूर्तता  करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य योजनेने विविध ऑनलाइन चॅनेलद्वारे सेवांच्या वितरणावर भर दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *