ताराचंद रामनाथ रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी लोकार्पण.

ताराचंद रामनाथ रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी लोकार्पण.

पुण्यातील सेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा येत्या शुक्रवारी (17 सप्टेंबर) रोजी दुपारी 4.30 वाजता महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर-पुणे शाखेच्या वतीने हा प्लांट बसवण्यात आला असून यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती शिवाजीनगर-पुणे शाखेचे अध्यक्ष मंदार जोग यांनी आज येथे सांगितली. सदरचा लोकार्पण सोहळा कोरोना नियमांमुळे फक्त निमंत्रितांसाठी होणार आहे.

कोरोना काळात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे झालेले हाल लक्षात घेऊन ऑक्सिजन टंचाई होऊ नये या हेतूने एकावेळी सुमारे शंभर रुग्णांना उपयोगी होईल असा हा प्लांट आहे. कोरोना काळात गेल्या दिड वर्षात भारत विकास परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये तीन रक्तदान शिबिरे (सुमारे एक हजार व्यकींचे रक्तदान), सुमारे 2 हजार डॉक्टरांसाठी फेसशिल्ड, 10 हजारांहून अधिक सॅनिटायझर बाटल्यांचे वितरण, गरजूंसाठी सुमारे 2 हजार किराणा किट वाटप, समुपदेशनासाठी आरोग्यमित्र योजना राबविण्यात आली आहे. भारत विकास परिषदेच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून पुणे येथे कायमस्वरुपी कृत्रिम पाय रोपण व्यवस्था सुरु असून सुमारे 20 हजार गरजूंनी याचा लाभ घेतला आहे. विकलांग मुक्त भारत हा संकल्प घेवून सेवा, समर्पण आणि सहयोग या त्रिसूत्रीच्या आधारे सन 1963 पासून भारत विकास परिषदेचे काम संपूर्ण देशभर सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *