तिन्ही सैन्यदले व तटरक्षक दलात सिम्युलेटर्सचा वापर वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने योजना जाहीर केली.
ठळक वैशिष्ट्ये:
- सर्व सैनिकी क्षेत्रांत सिम्युलेशन आधारित प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यावर भर.
- स्वस्त, सुरक्षित व स्मार्ट पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न
- स्वदेशी संरचना व विकसनावर भर
- सिम्युलेटर्स ची देखभाल व वापराची जबाबदारी भारतीय कंपन्यांकडे देणार
- सर्व प्रकारच्या सध्या वापरात असलेल्या तसेच नवीन सिम्युलेटर्स साठी हेच धोरण लागू.
तिन्ही सैन्यदले व तटरक्षक दलात सिम्युलेटर्सचा वापर एकसमान पातळीवर वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक योजना जाहीर केली आहे. सैनिक, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, देखभाल करणारे, व्यवस्थापक, जीवशास्त्रज्ञ , सामग्रीसम्पादक तसेच आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या अशा सर्व सैनिकी क्षेत्रांत सिम्युलेटर्स वर आधारित प्रशिक्षणाला सुरुवात करणे आणि परिणामस्वरूप स्वस्त, सुरक्षित , प्रभावी , गतिमान व स्मार्ट प्रशिक्षण देणे, हे प्रमुख उद्दिष्ट असेल.
या योजनेत स्वदेशी संरचना व विकसनावर भर असून सिम्युलेटर्स चालवणे, तसेच देखभालीची जबाबदारी भारतीय कंपन्यांकडे आऊटसोर्स केली जाईल. या योजनेची उद्दिष्टे व लक्ष्ये पुढीलप्रमाणे असतील:
- हत्यारे व इतर उपकरणाची प्रत्यक्ष हाताळणी व वापर कमी करणे.
- सिम्युलेटर्सचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवत नेण्यासाठी सक्षम कालबद्ध योजना लागू करणे.
- खरेदी प्रक्रियेच्या आधी सिम्युलेटर्सची आवश्यकता किती आहे, हे नीट ठरवणे.
- सिम्युलेटर्सच्या खरेदीआधी विविध सरकारी संस्थांमध्ये समन्वय साधत एकत्रितपणे आवश्यकता निश्चित करणे.
सैन्यदलांकडे सर्व प्रकारच्या सध्या वापरात असलेल्या तसेच नवीन सिम्युलेटर्स साठी हेच धोरण लागू असणार आहे. प्रशिक्षणावरील खर्च कमी करत तसेच लढाऊ उपकरणांना सुस्थितीत ठेवूनही सैन्यदलाची युद्ध दक्षतेची पातळी वर नेण्यासाठी या सिम्युलेटर्सचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल, याचा सतत विचार केला जाईल.
भारतीय सैन्यदले व तटरक्षक दलांना या सिम्युलेटर्सचा जास्तीत जास्त उपयोग सक्षमतेने करता यावा यासाठी संरक्षण मंत्रालयाने आपल्या सर्व प्रभागांना व संपर्कातील उद्योजकांना यासंबंधात सूचना दिल्या आहेत. सैनिकी सिम्युलेटर्सचे उत्पादन, वापर व देखभालीसाठी सैन्यदलांकडून स्वदेशी कंपन्यांना आमंत्रित केले जाईल. यामुळे विकास, उत्पादन व देखभाल क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना उत्तेजन मिळेल.