South Africa defeat India in 3rd Test, clinch series 2-1.
तिसऱ्या कसोटी सामन्यासह भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली.
केपटाऊन: केपटाऊन इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ७ गडी राखून भारतावर विजय मिळवला. त्याबरोबरच ही मालिकाही २-१ अशी जिंकली. या सामन्यात भारतानं पहिल्या डावात २२३ तर दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात २१० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी त्यांना २१२ धावांची गरज होती. हे लक्ष्य त्यांनी फक्त ३ गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. किगन पीटर्सननं सर्वाधिक नाबाद ८२ धावा केल्या. त्याला दुस्सन ४१, कर्णधार डीन एल्गर ३०, आणि टेंबा बोओमानं ३२ धावा करत भक्कम साथ दिली.
भारतातर्फे जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, आणि शार्दुल ठाकूर यानं प्रत्येकी एक गडी बाद केला. कीगन पीटरसनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरविण्यात आलं.