तूर व उडीद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध

Chana Dal चणा डाळ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Restriction on extra stock of tur and udid dal till 31st October

तूर व उडीद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध

साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करणार

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची माहितीCitizens are urged to use cereals in their diet नागरिकांना आहारात तृणधान्याचा वापर करण्याचे आवाहन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News भरडधान्य

मुंबई : डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंची जास्त प्रमाणात दरवाढ होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारात केंद्र शासनाच्या दि. २ जून २०२३ च्या अधिसूचनेन्वये डाळींच्या साठ्यावर (तूर व उडीद) घाऊक, किरकोळ व्यापारी, मिलर्स व इम्पोर्टर्स यांच्यावर ३१ ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त साठा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध पुरवठा यंत्रणेकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलवर डाळींचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे. तूर व उडीद डाळींचा साठा निर्बंध खालीलप्रमाणे –

घाऊक व्यापारी :- प्रत्येक डाळीसाठी २०० मेट्रीक टन

किरकोळ व्यापारी :- प्रत्येक डाळीसाठी ५ मेट्रीक टन

बिग चेन रिटेलर्स :- प्रत्येक डाळीसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी ५ मेट्रीक टन व डेपोसाठी २०० मेट्रीक टन मिलर्स :- गत तीन महिन्यांतील असलेले उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या २५ टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागू होईल.

इम्पोटर्स :- सीमा-शुल्क मंजूरीच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करून ठेवता येणार नाही. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ; आधारबेस फेसलेस सुविधा
Spread the love

One Comment on “तूर व उडीद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *