तेलशुद्धिकरण प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं विरोधकांना आव्हान

मंत्री उदय सामंत Minister Uday Samant हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Industry Minister challenges the opposition to clarify their position regarding the oil refinery project

तेलशुद्धिकरण प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं उद्योगमंत्र्यांचं विरोधकांना आव्हान

रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथल्या प्रस्तावित तेलशुद्धिकरण प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं उद्योगमंत्र्यांचं विरोधकांना आव्हान

बारसू प्रकल्पबाधितांवर दडपशाही न करता विश्वासात घ्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी

स्थानिकांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं-अजित पवार

मंत्री उदय सामंत Minister Uday Samant हडपसर मराठी बातम्या Hadapsar News
File Photo

मुंबई / नाशिक: रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित तेलशुद्धिकरण प्रकल्पाबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते.

ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गावच्या जत्रेला गेले असून पुढचं दीड वर्ष तेच मुख्यमंत्रीपदी राहतील असं त्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितलं. याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला

स्थानिकांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं-अजित पवार

बारसू रिफायनरी बाबतीत स्थानिकांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक आंदोलकांना अटक करण्यात येत आहे, पत्रकारांना धमकावण्यात येत आहे याचा आपण तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे, असं सांगत संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी स्थळी स्थानिक नागरिक महिला मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत असताना आज पोलिसांनी त्यांच्यावर आणि वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारनं ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावं, अशी मागणी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

स्थानिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असूनही कोकणात बारसू इथं सरकारने सर्वेक्षणाचं काम सुरू केल्याबद्द्ल उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. सरकार दडपशाही करत असून शासकिय सर्वेक्षण थांबवण्याची मागणी त्यांनी केली.

प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, एक जाहीर प्रेझेंटेशन द्यावं आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी, अशी मविआ सरकारची अट होती, असं सांगत आदित्य ठाकरेंंनी तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याचीही मागणी केली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *