थंडीने हडपसर गारठले, परिसरात धुक्याची चादर .
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हडपसर परिसरात थंडी वाढली आहे.
आज हडपसर मध्ये पहाटेपासून धुक्यांची चादर, ढगाळ हवामान होते. दाट धुक्यामुळे दिवसाची दृष्यमानता ही कमी झाली होती. आज दिवसभर ढगाळ हवामान होते. दुपारनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही.
ढगाळ वातावरणासह पाऊस, दाट धुके आणि थंडी असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे थंडी आणि पाऊस असा संमिश्र वातावरणाचा अनुभव हडपसरकर घेत आहेत.
त्यात बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने गेले तीन दिवस हडपसर परिसरात वाहतुकीची कोंडी बघायला मिळाली.