IND vs SA: South Africa 118/2 in 2nd innings at Stumps on Day 3.
दक्षिण आफ्रिका 118/2 दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी.
जोहान्सबर्ग: जोहान्सबर्ग कसोटी विजयाच्या दिशेने दक्षिण आफ्रिकेनं वाटचाल सुरू केली आहे. विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २४० धावा कराव्या लागणार आहे.
तिसऱ्या दिवशाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी २ बाद ११८ धावा केल्या होत्या. डीन एल्गर ४६ आणि दुसेन ११ धावांवर खेळत होता. तर एडन मरक्रम ३१ आणि कीगन पीटरसन २८ धावांवर बाद झाले होते.
त्यापूर्वी भारताचा दुसरा डाव २६६ धावांमध्ये आटोपला होता. चेतेश्वर पुजारानं ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ५८ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा, मार्को जेनसन आणि लुंगी निगेडी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. शार्दुल ठाकूरच्या ६१ धावांच्या मोबदल्यात ७ गडी टिपण्याच्या कामगिरीमुळं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांमध्ये आटोपला होता.