दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात के. एल. राहुलचं शतक.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरिअन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ३ बाद २७२ धावा झाल्या होत्या. भारताच्या सलामीवीर के एल राहुलनं आज शतक झळकावलं. २४८ चेंडूत १६ चौकारांसह त्यानं ही कामगिरी केली. आजचा खेळ थांबला तेव्हा राहुल १२२ तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर नाबाद असून त्यांनी चौथ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली आहे. मयांक अगरवाल ६०, चेतेश्वर पुजारा शून्यावर तर विराट कोहली ३५ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिदी यानं ४५ धावांत भारताचे तिनही गडी बाद केले.
स्टंप
पहिली कसोटी, सेंच्युरियन, डिसेंबर 26 – 30 2021, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
भारत
(९० षटके)
२७२/३
केएल राहुल नाबाद 122
अजिंक्य रहाणे नाबाद 40
दक्षिण आफ्रिका
पहिला दिवस – भारताने फलंदाजी निवडली..