दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या सर्वबाद २२३ धावा

In the first innings of the third Test against South Africa, India was all out for 223 runs.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या सर्वबाद २२३ धावा.

Indian Cricket Team
File Photo

केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं २२३ धावा केल्या आहेत. आज सामना सुरुहोण्याआधी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला.

मात्र, के एल राहूल आणि मयंक अग्रवाल ही सलामीची जोडी लवकर बाद झाली. दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या चेतेश्वर पुजारानं ४३ धावांची खेळी करत आजही भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

कर्णधार विराट कोहलीनं ७९ धावा केल्या. तर ऋषभ पंतनं २७ धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या कॅगीसो रबाडानं ४, तर मार्को जान्सननं ३, गडी बाद केले.

खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने १ गडी गमावून १७ धावा केल्या होत्या.  कर्णधार एडगर ३ धावांवर बाद होऊन परतला. बुमराने त्याचा बळी घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *