South Africa beat India by 7 wickets in a Test match.
दक्षिण आफ्रीकेचा कसोटी सामन्यात भारतावर ७ गडी राखून विजय.
जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात जोहान्सबर्ग इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेनं भारतावर ७ गडी राखून मात केली.
दक्षिण अफ्रिकेन पहिल्या डावातच भारतावर २७ धावांची आघाडी घेतली होती. भारताचादुसरा डाव कालच २६६ धावांनी संपला.
विजयासाठी दक्षिण अफ्रिकेला दुसऱ्या डावात २४० धावांचीगरज होती. आज चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे खूप उशीरा सुरु झाला. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरनं टेंबा बअुमाच्या साथीनंदमदार खेळ करत संघाला विजयाकडे नेलं. त्यानं १८८ चेंडूत नाबाद ९६ धावा केल्या.