Taking measures against terrorism is the need of the hour
दहशतवादाच्या विरोधात उपाययोजना करणं ही काळाची गरज
दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याचे स्रोत शोधून ते बंद करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन
सीमेपलीकडील दहशतवादासह त्याचे स्वरूप आणि प्रकटीकरण थांबवले पाहिजे
गोवा : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात SCO)शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन_, अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.
दहशतवादाचा धोका कायम आहे आणि दहशतवाद उखडून काढणं हे SCO च्या मूळ उद्दिष्टांपैकी एक आहे. दहशतवादाच्या विरोधात उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे, दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याचे स्रोत शोधून ते बंद केले पाहिजेत, असं ते म्हणाले.
इंग्रजीभाषक सदस्य देशांशी सखोल संबंध जोडण्यासाठी इंग्रजीला SCO ची तिसरी अधिकृत भाषा बनवण्याच्या भारताच्या दीर्घकालीन मागणीसाठी सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन डॉ. जयशंकर यांनी केलं.
ते म्हणाले की SCO चे अध्यक्ष या नात्याने भारताने SCO निरीक्षक आणि संवाद भागीदारांना 14 हून अधिक सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करून अभूतपूर्व सहभागाची सुरुवात केली आहे.
SCO सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आज, जुलैमध्ये होणा-या शिखर परिषदेत विचारासाठी ठेवल्या जाणाऱ्या १५ प्रस्तावांना अंतिम रूप देण्याची शक्यता आहे. सदस्य देशांमधे व्यापार, तंत्रज्ञान, वाणिज्य, सुरक्षा आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंध या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवणं, हे या प्रस्तावांचं उद्दिष्ट असेल.
भारताने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये SCO गटाचे अध्यक्षपद स्वीकारले. एससीओ बैठकीच्या बाजूला डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या चिनी, रशियन आणि उझबेकिस्तानच्या समकक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली.
डॉ जयशंकर यांनी एससीओचे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेतली आणि भारताच्या एससीओ अध्यक्षपदासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले. SCO मध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान आणि चार मध्य आशियाई देश – कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सदस्य आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com