Class 10 results will be announced tomorrow June 2 at 1 pm
दहावीचा निकाल उद्या 2 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार
पुणे: 12 वी च्या निकालानंतर अनेक पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष हे आता 10 चा निकालाकडे लागलं होतं. त्याचीही प्रतिक्षा आता संपली आहे. दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कमालिची उत्सुकता पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत घोषणा केली आहे. तर उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकता.
यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com