Education department’s decision to provide vocational guidance and counselling to students of class 10 based on various skills
दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन तसंच समुपदेशन करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
मुंबई : दहावी परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून सुमारे आठ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन तसंच समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
यासंदर्भात विविध शासकीय, अशासकीय संस्थांनी कौशल्यावर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षण, समुपदेशासाठी शिबीर आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर एकूण ३६६ गैरप्रकार घडले आहेत.
कॉपी केल्याची सर्वाधिक ३३ प्रकरणे नाशिक विभागीय मंडळात घडली असून, छत्रपती संभाजीनगर विभागात ३०, नागपूर २६, पुणे १४, लातूर आठ, अमरावती चार, तर मुंबईत कॉपीचा एक प्रकार समोर आला. कोल्हापूर तसंच कोकण विभागात एकाही कॉपी प्रकरणाची नोंद झाली नाही. परीक्षेदरम्यान शिक्षकांनी परीक्षार्थ्यांना सहाय्य केल्याप्रकरणी पुणे आणि नागपूर विभागीय मंडळात प्रत्येकी एक प्रकार नोंदवण्यात आला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com