देशभरात आजपासून १५ ते १८ वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू.

देशभरात आजपासून १५ ते १८ वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू.COVID-19 vaccination for children in the age group of 15 to 18 years

दिल्ली / मुंबई : शभरात आजपासून १५ ते १८ वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालं. Cowin.gov.in या वेबसाइटवर ही नोंदणी करुन लसीकरणासाठी वेळ निश्चित करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर थेट जाऊनही नोंदणी करुन लस घेता येईल.
नोंदणी एक जानेवारीपासून सुरू झाली आहे.  सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जात आहे. २००४ यावर्षी  किंवा आधी जन्मलेली मुलं कोविशिल्डसह इतर लसींसाठी पात्र आहेत २००५ ते २००७ या कालावधीत जन्माला आलेल्या मुलांना फक्त कोवॅक्सिन ही लस घेता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातही आज सर्वत्र १५ ते १८ वर्षे या वयोगटासाठीचं लसीकरण सुरु झालं. याविषयी राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी अधिक माहिती दिली.

मुंबई महापालिकेच्या ९ लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वर्षे या वयोगटासाठीचं लसीकरण सुरु झालं. भायखळा, शीव, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल, गोरेगांव, मालाड, दहिसर, कांजूरमार्ग आणि मुलुंड इथल्या प्रत्येकी एक केंद्रांवर ही सोय उपलब्ध आहे. या प्रत्येक केंद्राची दरदिवशी ५०० ते हजाहून अधिक लाभार्थ्यांना लस देण्याची क्षमता आहे.
लसीकरण अधिक सुरळीत आणि गतीनं व्हावं यासाठी बहुतांश लसीकरण केंद्र आणि शाळांनी परस्पर सहकार्य आणि समन्वयाचा करार केला आहे.

दरम्यान राज्यातल्या इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *