देशाच्या नागरी विमान उड्डाण क्षेत्रात प्रवासी संख्येमध्ये उल्लेखनीय वाढ

Air India Flight

Significant growth in passenger numbers in the country’s civil aviation sector

देशाच्या नागरी विमान उड्डाण क्षेत्रात प्रवासी संख्येमध्ये उल्लेखनीय वाढ

देशांतर्गत विमान कंपन्यांमार्फत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वार्षिक वृद्धी 36.10% तर मासिक वृद्धी 15.24% नोंदवली गेली

जानेवारी – मे 202

Air India Flight
File Photo

नवी दिल्ली : देशाच्या नागरी विमान उड्डाण क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे. देशातल्या विविध विमान कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मे 2023 या कालावधीत प्रवासी संख्येनं 636 लाखांहून अधिकचा टप्पा गाठला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 36 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ दर्शवत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात, विमान प्रवासी संख्या 114 लाखांहून अधिक होती, जी या वर्षी मे महिन्यात 132 लाखांहून अधिक झाली आहे, म्हणजेच प्रती महिना 15 पूर्णांक 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रवाशांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची ताकद आणि टिकाऊपणा दर्शवते. यासोबतच संपर्क सुविधा सुधारण्यासाठी तसेच देशातील नागरिकांना सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांची ही परिणीती आहे. जानेवारी – मे 2023 दरम्यान 636.07 लाख प्रवाशांचा उच्च भार घटक हवाई वाहतुकीची वाढती मागणी सूचित करतो, तसेच यातून विमान वाहतूक उद्योगाची अनुकूल दिशा अधोरेखित होते.

“विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला एक प्रमुख जागतिक हवाई वाहतूक केंद्र म्हणून स्थापित करण्यात सर्व हितधारकांच्या सहयोगी प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. देशांतर्गत विमानसेवा उद्योगाचा सतत होणारा विस्तार आणि प्रादेशिक विमान कंपन्यांची स्थापना या बाबी आपली अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत, सोबतच देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडत आहे आणि उडान योजनेद्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंतची संपर्क सुविधा सुनिश्चित करत आहे, असे ते म्हणाले. सुरक्षा, मजबूत कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करत विमान वाहतूक उद्योगाची भरभराट होण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठीही मंत्रालय वचनबद्ध आहे.” असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.

काळजीपूर्वक आणि कसून नियोजन, कार्यात्मक परिणामकारकता आणि हवाई वाहतूक उद्योगाने केलेल्या सक्रिय कृतींचा परिणाम म्हणून हे यश प्राप्त झाले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *