The defence minister asserted that the government is working to create a developed India by 2047
२०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : देशाच्या सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भारताला जागतिक शक्तीस्थान बनवण्यासाठी सरकारनं अलीकडच्या काळात अनेक ठोस पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं.
आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमाला संबोधित करताना सिंह यांनी अर्थव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या दिशेनं उचललेल्या पावलांकडे लक्ष वेधून ते म्हणाले, सरकारनं स्वावलंबनाला चालना देऊन संरक्षण क्षेत्रात परिवर्तन केलं आहे.
भारतीय सैन्याच्या वापरासाठी सरकारनं अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादनानं अलीकडेच १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचं ते म्हणाले.
भारताला पुनरुत्थान करणारी महासत्ता असल्याचे सांगून मंत्री म्हणाले, सरकारने कर रचनेत परिवर्तनीय बदल केले आहेत आणि देशात व्यवसाय करण्याच्या सुलभतेला चालना दिली आहे. ते म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी करसंकलन झाले असून विदेशी गुंतवणूकदार भारताकडे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून पाहत आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com