देशातल्या १५५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस.

More than 155 crore beneficiaries in the country have been vaccinated against corona.

देशातल्या १५५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस.

नवी दिल्ली : देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७६ लाख ३२ हजार २४ नागरिकांचं लसीकरण झालं.More than 155 crore beneficiaries in the country have been vaccinated against corona. आतापर्यंत २६ लाख ७३ हजार ३८३ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या दोन लाख ४७ हजार ४१७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ६३ लाखापेक्षा जास्त झाली असून या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८५ हजार ३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

काल ८४ हजार ८२५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४७ लाख १५ हजार ३६१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ११ लाख १७ हजार ५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *