3 lakh 17 thousand 532 new patients of Kovid were registered in the country yesterday.
देशात काल कोविडच्या ३ लाख १७ हजार ५३२ नव्या रुग्णांची नोंद.
नवी दिल्ली : देशभरात काल कोविडचे ३ लाख १७ हजार ५३२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ५१ झाली आहे.
काल दिवसभरात दोन लाख २३ हजार ९९० रुग्ण कोविडमधून बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णाक ६९ शतांश झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ५८ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण ९ हजार २८७ रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत ३ पूर्णांक ६३ शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटी ६७ लाखांहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात ७३ लाख ३८ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात आली.