Instructions for setting up district and sub-district level corona control centres in the country.
देशात जिल्हास्तरीय आणि उपजिल्हास्तरीय कोरोना नियंत्रण केंद्रं स्थापन करण्याच्या सूचना.
नवी दिल्ली : कोविड व्यवस्थापनासाठी सर्व राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जिल्हास्तरीय आणि उपजिल्हास्तरीय नियंत्रण केंद्रे स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
या केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर्स तसंच इतर पायाभूत सुविधा परिपूर्ण असाव्यात आणि केंद्रातील अधिकाऱ्यांनी रुग्णांना पुरेशा खाटा उपलब्ध होण्यासाठी देखरेख करावी, अशा सूचना देणारं पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य तसच प्रधान सचिवांना लिहिलं आहे.
या नियंत्रण केंद्रांमध्ये आसपासची कोरोना चाचणी केंद्र तसंच रुग्णवाहिका उपलब्धतेविषयी अद्ययावत माहिती असावी, तसंच रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी ही केंद्रे अहोरात्र चालू ठेवावीत असे निर्देश या पत्रात दिले आहेत.