धावत्या बसमध्ये चित्र रेखाटणारा अवलिया…
पुणे: आपल्याकडे विद्येची देवता श्रीगणेश १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याचे नेहमी सांगितले जाते. अन् श्रीगणेशाच्या अंगी असलेल्या याच ६४ कलांपैकी कोणतीही एक कला आपल्या अंगी बाणावी यासाठी आपण त्याची मनोभावे पूजा करतो.
या ६४ कलांपैकी चित्रकला किंवा रेखा चित्र हे त्यापैकीच एक! रंगविलेल्या आकारांतून कलाकृती साकारणे म्हणजे चित्रकला. तर पेन्सिलच्या सहाय्याने आपल्य मनातील भावना कागदावर उतरवून त्या रेखाटणे म्हणजे रेखाचित्र. या दोन्ही कलांच्या साधनेत एकाग्रता हा अतिशय महत्त्वाची असते. या साधनेत थोडीही एकाग्रता भंग झाली; तर त्या चित्रासाठी किंवा रेखा चित्रासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरलं जाते.
पुण्यात एका अशा अवलियाने आपली एकाग्रता भंग होऊ न देता, एक उत्तम रेखाचित्र साकारलं असून, त्याच्या कलाकृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पुण्यातील यज्ञेश सोनटक्के हा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी. पण त्याची चित्रकला विशेष करुन रेखाचित्रातील हातोटीत कोणीही हात धरु शकत नाही आहे. या विद्यार्थ्यांने आपल्या शाळेत जाण्याच्या मार्गात चालत्या बसमध्ये जो विक्रम केला आहे, त्याची सर्वच स्तरातून दखल घेतली जात आहे.
यज्ञेशने ३ डिसेंबर २०२२ रोजी फुलगांव ते स्वारगेट प्रवासादरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे रेखाचित्र आपल्या कुंचल्यातून साकारले आहे. विशेष म्हणजे, धावत्या बसमध्ये त्याने हा विक्रम साकारताना रेखाचित्राची एकही रेष हलेली नाही.
आज त्याच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही त्याच्या कलाकृतीचे मुक्तकंठाने स्तुती केली आहे. सोमवारी ५ डिसेंबर २०२२ रोजी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी यज्ञेशचा विशेष सत्कार देखील पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच अशा प्रकारच्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन, उत्साह वाढवत असतात.
त्याच्या या यशामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगांवचे संस्थापक दीपक पायगुडे, संचालक नरहरी पाटील, प्राचार्य अमर क्षीरसागर, कला शिक्षक साळुंखे, यज्ञेशची आई माधुरी सोनटक्के, भाजप नेत्या कांचन कुंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com