नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी P’ची चाचणी यशस्वी.

New generation ballistic missile ‘Agni P’

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे नव्या श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी P’ची चाचणी यशस्वी.New generation ballistic missile ‘Agni P’

ओदिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजून 06 मिनिटांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नव्या  श्रेणीतील अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी P’ ची घेतलेली चाचणी यशस्वी झाली.

विविध दूरमापन म्हणजेच दूर अंतरावरुन होणार्‍या संदेशांच्या  स्वयंचलीत प्रक्षेपणाने, रडार, विद्युत प्रकाशीय केंद्र आणि पूर्व किनारपट्टीवरील डाउन रेंज जहाजांनी क्षेपणास्त्राच्या लक्ष्य गाठण्याच्या मार्गक्रमणाचा आणि मापदंडांचा मागोवा घेतला आणि त्याचे निरीक्षण केले. क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी  मार्गक्रमणानंतर मोहिमेची सर्व अत्युच्च अचूकतेने पूर्ण केली.

अग्नी पी हे ड्युअल रेड्युनन्ट नेव्हिगेशन आणि गाईडन्स  प्रणालीसह टू -स्टेज कॅनिस्टराइज्ड घन परिचालक आंतरखंडीय  क्षेपणास्त्र आहे.या क्षेपणास्त्राच्या दुसऱ्या उड्डाण चाचणीने, प्रणालीमध्ये  एकत्रित केलेल्या सर्व अत्याधुनिक  तंत्रज्ञानाची विश्वसनीय कामगिरी सिद्ध केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी यशस्वी झाल्याबद्दल  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे  अभिनंदन केले आणि प्रणालीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.संरक्षण संशोधन आणि विकास  विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी, अनेक अतिरिक्त वैशिष्ट्यांसह दुसरी अत्याधुनिक  उड्डाण चाचणी करण्यासाठी चमूने केलेल्या  प्रयत्नांचे कौतुक केले आणि यावर्षात  सलग यश मिळाल्याबद्दल अभिनंदन केले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *