नागरी सेवांना भविष्यवादी दृष्टी प्रदान करणे हे “कर्मयोगी अभियानाचे” उद्दिष्ट .

Union Minister Dr Jitendra Singh says the aim of “Mission Karmayogi” is to impart a futuristic vision to civil services which could effectively determine the roadmap for the next 25 years and shape the Century India of 2047.

नागरी सेवांना भविष्यवादी दृष्टी प्रदान करणे हे “कर्मयोगी अभियानाचे” उद्दिष्ट असून जे पुढील 25 वर्षांचा आराखडा प्रभावीपणे ठरवू शकेल आणि 2047 मध्ये स्वातंत्र्याची शतकपूर्ती साजरी करणाऱ्या भारताला आकार देऊ शकेल – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवं भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षेनुसार आचरण करण्यासाठी प्रशासनात “नियमाकडून” “भूमिके” कडे वळण्याची अत्यावश्यक गरज आहे: डॉ जितेंद्र सिंह

सुशासन सप्ताह साजरा करण्याचा एक भाग म्हणून कर्मयोगी अभियान –भविष्यातील मार्ग या कार्यशाळेला मंत्र्यांनी संबोधित केले.Union Minister Dr Jitendra Singh says the aim of “Mission Karmayogi” is to impart a futuristic vision to civil services which could effectively determine the roadmap for the next 25 years and shape the Century India of 2047.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) , डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, नागरी सेवांना भविष्यवादी दृष्टी प्रदान करणे हे “कर्मयोगी अभियानाचे” उद्दिष्ट असून जे पुढील 25 वर्षांचा आराखडा प्रभावीपणे ठरवू शकेल आणि 2047 मध्ये स्वातंत्र्याची शतकपूर्ती साजरी करणाऱ्या  भारताला आकार देऊ शकेल.

सुशासन सप्ताह साजरा करण्याचा एक भाग म्हणून कर्मयोगी अभियान- भविष्यातील मार्ग या कार्यशाळेला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवं भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षेनुसार आचरण करण्यासाठी प्रशासनात “नियमाकडून” “भूमिके” कडे वळण्याची नितांत  गरज आहे. ते म्हणाले, नागरी सेवेसाठी ‘उद्देशासाठी योग्य’ आणि ‘भविष्यासाठी योग्य’ असा सक्षमता-आधारित क्षमता निर्मिती दृष्टीकोन आवश्यक आहे जो या  भूमिका पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण क्षमता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि हेच कर्मयोगी अभियानाचे मुख्य ध्येय आहे.

एकात्मतेच्या संकल्पनेवर विचार मांडताना, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की भारतीय लोक प्रशासन संस्था, IIPA ने IIPA येथे एक मिशन-कर्मयोगी संसाधन कक्ष स्थापन केला आहे आणि राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोग, LBSNAA आणि इतर केंद्रीय प्रशिक्षण संस्था (CTIs) यांच्याशी निकट समन्वयाने काम करत आहे.

डॉ जितेंद्र सिंह यांनी आशा व्यक्त केली की मिशन कर्मयोगी हे निरंतर वितरण वाढवण्यामध्ये आणि वर्धित करण्यात एक प्रमुख सहाय्यक ठरेल आणि कालांतराने पंतप्रधानांनी निश्चित केलेल्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करू शकेल.

माजी पंतप्रधान अटल बिहारी  वाजपेयी यांच्या सुशासनातील अतुलनीय योगदानाचे स्मरण करून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकारच्या उत्तरदायित्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या त्यांच्या  दूरदृष्टीचे यानिमित्ताने स्मरण करूया.

डॉ जितेंद्र सिंह यांनी याप्रसंगी आयजीओटी प्लॅटफॉर्मचे अल्प परिचयाद्वारे अनावरण केले.

यातील इतर काही सुशासन उपक्रम याप्रमाणे –

  1. ई-समीक्षा-
  2. ई-ऑफिस-
  3. नियुक्तीसाठी कागदपत्रांचे स्वयं-प्रमाणीकरण; सर्व गट ‘क, गट ‘ब’(अराजपत्रित पदे) भरतीतील मुलाखती बंद करणे.
  4. संयुक्त सचिव आणि त्यावरील पदांच्या भरतीसाठी बहु-स्रोत अभिप्राय;
  5. सर्वांगीण पद्धतीने ई-प्रशासनाचा प्रचार करणे;
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *