निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित आगरकर

Senior cricketer Ajit Agarkar as the chairman of the selection committee निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित आगरकर हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Senior cricketer Ajit Agarkar as the chairman of the selection committee

निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित आगरकर

बीसीसीआयकडून निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती

मुंबई : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा हे याआधी निवड समितीचे अध्यक्ष होते. मात्र एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनंतर शर्मा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून निवड समिती अध्यक्ष हे पद रिक्त होतं.Senior cricketer Ajit Agarkar as the chairman of the selection committee
निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित आगरकर
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे. शिवसुंदर दास,सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन शरत हे निवड समितीचे इतर सदस्य आहेत. अजित आगरकरने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आणि आता अशा परिस्थितीत ते आपल्या अनुभवाने टीम इंडियाला खूप फायदा मिळवून देऊ शकतात.

अजित आगरकर यांना बॉम्बे डक असंही म्हटलं जातं. आगरकर यांनी टीम इंडियात वेगवान गोलंदाज म्हणून भूमिका बजावली. मात्र गोलंदाजीसह बॅटिंगमध्येही त्यांनी मोठे विक्रम केले.

मागच्या पिढीत अष्टपैलू खेळाडू म्हणून अजित आगरकर यांनी २६ कसोट्या, १९१ एकदिवसीय सामने, चार टी ट्वेंटी, या व्यतिरिक्त प्रथम दर्जाचे११०सामने, २७० अ श्रेणी सामने खेळले आहेत. २००० मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक करून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

माजी वेगवान गोलंदाज म्हणून, 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकात तो भारताच्या विजयी संघाचा भाग होता. जवळपास एका दशकात सर्वात जलद ५० एकदिवसीय विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे; केवळ 23 सामन्यांमध्ये हा टप्पा पूर्ण केला.

माजी दिग्गज क्रिकेटपटू अजित आगरकर सध्या सुट्टीवर आहेत. तथापि, ते पुढील आठवड्यात पदभार स्वीकारतील आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येईल. दुसरीकडे आगरकर यांना अनेक मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, कारण आशिया कप २०२३ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ देखील याच वर्षी खेळवले जाणार आहेत, ज्यासाठी योग्य संघ बनवणे खूप आव्हानात्मक असणार आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 

Spread the love

One Comment on “निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित आगरकर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *