केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते, नीट 3.0 (NEAT 3.0)आणि एआयसीटीईच्या नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाची तांत्रिक पुस्तके प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित.
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण आणि कौशल्या विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते, नीट-3.0 (NEAT 3.0) म्हणजे – ‘तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य’ चे उद्घाटन झाले. या उपक्रमामुळे, देशातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत अशा शिक्षण-तंत्रज्ञान आधारित शंका निरसन आणि अभ्यासक्रम, एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. यावेळी, प्रधान यांच्या हस्ते, एआयसीटीईच्याअ तंत्रज्ञान विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
नीट: 3.0 हा प्लॅटफॉर्म देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल सुविधा पोहचवून, देशातील डिजिटल दरी कमी करण्यात अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा प्रधान यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. तसेच, जगाला ज्ञान-आधारित गरजांची पूर्तता करण्यात, देखील याअ प्लॅटफॉर्मचा मोठा उपयोग होणयर आहे, असेही ते म्हणाले .
नीट: 3.0 प्लॅटफॉर्मवर 58 जागतिक आणि भारतीय स्टार्ट अप कंपन्या असून विद्यार्थ्यांसाठी, 100 अभ्यासक्रम आणि ई- संसाधने उपलब्ध आहेत. ज्यातून, विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये शिकता येतील, अशी माहिती प्रधान यांनी दिली.
एआयसीटीसी ने स्किल इंडियाच्या सहकार्याने नीट प्लॅटफॉर्मसाठी अभ्यासक्रम तयार करावेत,जेणेकरुन, उदयोन्मुख क्षेत्रातील संधी शोधून, देशात रोजगारनिर्मितीला चालना देता येईल आणि तरुणांना भविष्यासाठी सज्ज करता येईल, असेही प्रधान म्हणाले. एआयसीटीसी आणि शिक्षण-तंत्रज्ञान कंपन्यांनी अगदी कमीतकमी पैशात, ई-संसाधने उपलब्ध करुन द्यावीत, अशी विनंतीही प्रधान यांनी केली.
आज, 12 लाखांपेक्षा जास्त आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना नीट (NEAT) 3.0 अंतर्गत 253 कोटी रुपयांचे मोफत एड-टेक कुपन्स मिळाले आहेत याबद्दल प्रधान यांनी आनंद व्यक्त केला. वर्ष 2022 ची विद्यार्थ्यांसाठी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली सर्वात मोठी भेट आहे, ते म्हणाले.
प्रादेशिक भाषांमधील तांत्रिक पुस्तकांबद्दल बोलताना प्रधान म्हणाले, भाषांचे वैविध्य ही आपली ताकद आहे आणि तिचा योग्य वापर करून नवोन्मेषी समाज तयार करणे हे महत्वाचे आहे. प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतल्याने मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित करेल आणि आपल्या युवकांना जागतिक नागरिक बनण्यात मदत करेल.