Greetings from all over the country to Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thackeray.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन.
दिल्ली / मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे.यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
आपल्या स्वतंत्र भारताच्या संकल्पासाठी नेताजींनी अत्यंत धाडसी पावलं उचलली, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्याग देशाला नेहमीच प्रेरणा देत राहिल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.नेताजींनी भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाकरता आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनीही आज उत्तर प्रदेशातल्या भाजपा कार्यालयात सुभाषचंद्र बोस यांना पुष्पांजली अर्पित केली.
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त संसदेच्या आवारात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह संसदेच्या अनेक आजी माजी सदस्यांनी, सेंट्रल हॉल इथल्या सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.
नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा पुर्ण होईपर्यंत त्याठिकाणी नेताजीचा पुतळा त्रीमिती छायाप्रकाशाच्या साहाय्यानं साकार जाणार आहे. या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण आज, नेताजींच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २०१९, २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षांसाठीच्या सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचं वितरणही केलं जाईल. यंदाच्या पुरस्कारांमध्ये संस्थांच्या वर्गवारीत गुजरातमधल्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेला तर वैयक्तीक वर्गवारीत प्राध्यापक विनोद शर्मा यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.
त्यानिमीत्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. एका ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे-
“श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कायम लोकांच्या पाठीशी उभे राहणारे एक अद्वितीय नेते म्हणून ते नेहमीच लोकांच्या स्मरणात राहतील.”
बाळासाहेब यांच्या अमोघ नेतृत्वासाठी ते कायम स्मरणात राहतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला.विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. बाळासाहेबांनी त्यांच्या वक्तृत्वं, नेतृत्वं, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करुन अभिवादन केले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान योद्धे, आझाद हिन्द सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. महात्मा गांधीजींनी ‘देशभक्तांचे देशभक्त’ असा नेताजींचा गौरव केला होता, नेताजींनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ संबोधून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेताजींचा गौरव करुन देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं.