Chief Minister’s instructions for proper planning for Pandharpur’s Ashad Yatra route
पंढरपूरच्या आषाढ यात्रेच्या वारीसाठी चोख नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पंढरपूर आषाढी वारीसाठी दुप्पट तरतूद
मुंबई : कोवीडच्या पार्श्वभूमीवर यंदा वारीसाठी भाविकांची अधिक गर्दी होऊ शकते या वारीसाठी चोख नियोजन करावं, वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पंढरी आषाढी वारीच्या तयारीची आढावा बैठक आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पालखी मार्गावरचे टोल नाके सुरु राहणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पंढरपूर आषाढी वारीसाठी नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची दुप्पट तरतूद केली असून रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही दिले.
बैठकीला महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com