Strangers coming to Pandharpur should be allowed to stay only after identification
पंढरपूर इथं येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटल्यानंतरच राहायला परवानगी द्यावी – जिल्हा प्रशासनाचे आदेश
सोलापूर : आषाढी वारी आणि यात्रेनिमीत्त सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख पटल्यानंतरच त्यांना राहायला परवानगी द्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेेत. वारी आणि यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून असे निर्देश दिल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
वारीच्या काळात जिल्ह्यात कोणी नव्यानं राहायला आलं, किंवा अशा व्यक्तीला जे कोणी राहायला जागा उपलब्ध करून देतील, अशा सर्वांनी त्या व्यक्तिची ओळख आणि वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी असंही आदेशात म्हटलं आहे.
यासोबतच वारीच्या काळात स्फोटक पदार्थ सोबत बाळगू नयेत, तसंच ज्वलनशील पदार्थांचा काळजीपूर्वक वापर करावा आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत अशी सूचनाही केली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com